ऋतु चर्या - वसंत ऋतु , ग्रीष्म ऋतू ( Seasonal Regimen - Spring , Summer )


वसंत ऋतु चर्या 
( १५ फेबरुवारी ते १५ एप्रिल )
वसंत ऋतु मध्ये देहबल हे मध्यम असते , हेमंत ऋतू मध्ये जमा झालेला कफ हा सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो , त्यामुळे
अग्नी हा मंद होतो ,
त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते .
*विहार* - काय करावे
१.व्यायाम करावा - हा व्यायाम अर्धा शक्ती पेक्षा कमी करावा म्हणजे हिवाळयामध्ये जेवढा सांगितलेलं आहे त्या पेक्षा कमी करावा .
२. उटणे लावावे
३. धूमपान करावे - औषिदी वनस्पती ना जाळून त्यांचा धूर घ्यावा
४. कवल धारण करावे - म्हणजे तेल मुखात धरणे
५. डोळ्यामध्ये अंजन घालवे
६. अंघोळसाठी कोमट पाणी वापरावे
७. चंदन चां लेप लावावा.
८. बाहेर जाताना छत्री वापरावी.

*आहार* - काय खावे
१.हलका आहार घ्यावा.
२. गहू , यव यांचे सेवन करावे
३. जुना मध घ्यावा.

*पंचकर्म* -
कफ प्रकृतीच्या व्यक्ती मध्ये वमन करावे.
ह्या ऋतु मध्ये कफाचा प्रकोप होत असल्यामुळे जाड , स्थूल व्यक्तींनी काळजी घावी.

*योगासन* - वसंत ऋतु करावयाचे
१. त्रिकोणासन
२. पञ्चमोतासन
३. पवांमुक्तसना
४. वीरभद्रासान
ही आसने करावी ह्या मुळे वाढलेला कफ कमी होण्यास मदत होते.


ग्रीष्म ऋतू चर्या

( १५ एप्रिल ते १५ जून )
ग्रीष्म ऋतू मध्ये बल हे वसंत ऋतु च्या मानाने कमी असते , सूर्याचे उष्णता मुळे सर्व पर्यावरण मधली जलीय अंश हा शोषला जातो , ह्यात सर्वच प्राणी, पक्षी,वृक्ष हे रुक्ष झालेलं असतात.

*विहार* - काय करावे
१. व्यायाम करू नये किंवा खूपच कमी करावा .
२. थंड असणाऱ्या खोली मध्ये दिवसा झोपावे .
३. रात्री चंदन लेप करून हवा खेळती राहील अश्या ठिकाणी झोपावे .
४. मनास प्रिय वाटेल असे काम करावे.

*आहार* - काय खावे
१. गोड पदार्थ खावे
२. थंड पदार्थ घ्यावे - आंब्याच्या रस , ताक .
३. तूप खावे
४. स्न्हिग्ध पदार्थ सेवन करावे.
५ . थंड पाण्यात साखर , तूप घालून सेवन करावा.
६. मांस सेवन करावे.
७. जुने तांदूळ खावे.

*योगासन
ग्रीष्म ऋतू मध्ये बल हे कमी असल्यामुळे आसने देखील कमी बलानेच करावी.
जास्त जोर लावून करू नये.
कष्टाची आसने करू नये.
शितली , सितकारी प्राणायाम करावा,  हा प्राणायाम  पित्ता वरती चांगले कार्य करते , ह्यामुळे तृष्णा वरती चांगले कार्य करते.


Comments

Popular Posts