ऋतु चर्या - In Ayurved

ऋतुचर्या - In Ayurved
आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन हे स्वस्थ व्यक्तीच्या स्वस्थ्यचे रक्षण करणे आणि रोगी व्यक्तीचा रोग बरा करणे हे आहे.
आयुर्वेद मध्ये एकूण ६ ऋतु चे वर्णन केले आहेत . तो तो ऋतु आहे त्याच्या लक्षणांनी ओळखावं , याचे सविस्तर वर्णन हे अष्टांग हृदय सूत्र स्थान ३ अध्याय मध्ये केले आहे.
१. हेमंत - १५ ऑक्टोबर ते १५ डिसेबर
२. शिशिर - १५ डिसेबर ते १५ फेबरुवारी
३. वसंत - १५ फेबरुवारी ते १५ एप्रिल
४. ग्रीष्म - १५ एप्रिल ते १५ जून
५. वर्षा - १५ जून ते १५ ऑगस्ट
६. शरद - १५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर
अश्या प्रकारे आपण इंग्रजी महिण्याशी तुलना करू शकतो परंतु आजच्या काळातील बदलेले स्वरूप पाहता हे योग्य ठरणार नाही.
त्या त्या ऋतु नुसार करायची चर्या ही आयुर्वेद मध्ये वर्णित केली आहे .
प्रत्येकी तीन असे ऋतूचे २ वर्गात विभागणी केली आहे , ही विभागणी त्या त्या ऋतु मध्ये असलेल्या बला नुसार केली आहे .
२ वर्ग .
A. उत्तरायण म्हणजेच आदांनकल
B. दक्षिणायन म्हणजेच विसर्गकाल

उत्तरायण मध्ये शिशिर , वसंत , ग्रीष्म ह्या ऋतुचा समवेश होतो ह्या मध्ये शरीरातील बल हे क्रमाने कमी कमी होत जाते म्हणजेच शिशिर ऋतू मध्ये बल चांगले असते तर ग्रीष्म ऋतू मध्ये बल कमी असते , सूर्य हा सृष्टी मधली सर्व बल हिरावून घेत असल्यामुळे ह्यास आदान काळ म्हणतात.

दक्षिणायन मध्ये वर्षा , शरद , हेमंत ह्या ऋतुचा समावेश होतो ह्या मध्ये शरीरातील बल हे क्रमाने वाढत वाढत जाऊन हेमंत ऋतू मध्ये उत्तम बल असते , सर्व सृष्टी मध्ये गारवा निर्माण झालेला असतो , ह्या मुळे बल प्रदान होत असते म्हणून यास विसर्ग काळ असे म्हणतात.

ऋतुसंधी - The Gap Between २ seasons.
ऋतुसंधी ही आयुर्वेद मध्ये सांगितलेली उत्तम अशी संदर्भ आहे . ह्यात एक ऋतु चे शेवटचे ७ दिवस आणि नवीन सुरू होणाऱ्या ऋतूचे ७ दिवस असा १४ दिवसांचा काळ सांगितलं आहे , ह्या काळामध्ये विशेष अशी काळजी घेण्यास सांगितले आहे , अगोदरच्या ऋतूचे चर्या ही हळू हळू सोडून नवीन सुरू होणाऱ्या ऋतूचे चर्या हळू हळू आत्मसात करायची आहे.

Comments

Popular Posts